पाणी वाया घालवणाऱ्यांवर मनपाचा चाबूक निष्काळजीपणा पडला महागात, ठोठावला दंड

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पाण्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांविरुद्ध आता कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याची सुरुवात पैठण गेट परिसरातून करण्यात आली.
पैठण गेट परिसरात नीलेश देशमुख नामक व्यक्ती नळाचे पाणी वाया घालविले जात असल्याचे निदर्शनास आले. मनपा आयुक्त अमोल येडगे आणि उपआयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी गंभीर दखल घेतली. आयुक्त अमोल येडगे यांनी संबंधित नागरिकावर १० हजार
रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचे 
पाणी
घरगुती वापरासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक घेणे, पाण्याच्या टाक्या भरल्यानंतर नळ सुरू ठेवणे, टाकीतून ओव्हरफ्लो होणारे पाणी रस्त्यावर वाहू देणे, घरासमोरील रस्ते किंवा परिसर धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे, वाहन धुताना मोठ्या प्रमाणात पाणी वापरणे, नळ किंवा पाइपलाइनमधून होणारी गळती वेळेत दुरुस्त न करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी नळ सुरू ठेवणे,
LUCKY FLORIST
अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. विशेषतः पाण्याच्या टाक्या भरल्यानंतरही पाणी रस्त्यावर वाहत राहणे हा पाण्याचा गंभीर अपव्यय असून, अशा प्रकारांकडे नागरिकांनीही गांभीर्याने पाहावे. आपल्या घरातील नळ, टाक्या आणि पाणीपुरवठ्याच्या जोडण्यांमध्ये गळती असल्यास ती तातडीने दुरुस्त करावी, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions