भाजप-शिवसेना नगरसेवकांची मागणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): बेकायदा बांधकामे आणि भूखंड नियमित करण्यासाठी महापालिकेने शुल्कात दिलेल्या सुटीमुळे मालमत्ताधारक गुंठेवारी कक्षात मोठी गर्दी करत आहेत. नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, भूखंड नियमित करण्यासाठी जाहीर केलेली ५० टक्के शुल्काची सवलत आणखी दोन महिन्यांसाठी वाढवून देण्यात यावी, अशी जोरदार मागणी शुक्रवारी (दि.१८) पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांकडून करण्यात आली. ३० ऑक्टोबरपर्यंत गुंठेवारीची मुदत आहे,
१६व्या क्रमांकाबद्दल प्रशासनाचे अभिनंदन
▶ 'स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२६' मध्ये छत्रपती संभाजीनगर शहराचा देशात १६ वा क्रमांक आला आहे. यापूर्वी शहराचा ३४ वा क्रमांक होता. या प्रगतीबद्दल घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्यासह प्रशासनाचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव माजी महापौर रशीद मामू यांनी मांडला. त्याला राजू वैद्य, किशोर नागरे आणि सभागृहनेते गोविंद केंद्रे यांनी अनुमोदन दिले.
ती संपल्यानंतर यावर निर्णय घेऊ, असे सांगत महापौर समीर राजूरकर यांनी यावर मार्ग काढला.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेवक राजू वैद्य यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. वैद्य म्हणाले, खुल्या भूखंडासाठी बेटरमेंट
शुल्कात दिलेल्या ५० टक्के सवलतीला संपताच एक महिन्याची मुदतवाढ महापौर राजूरकर यांनी दिली आहे, ही मुदत एक महिन्याची नव्हे, तर दोन महिन्यांची शेवटची मुदतवाढ म्हणून वाढवून द्यावी, अशी मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान म्हणाले, विकास
आराखड्यातील राखीव आणि शासकीय जागेवर अनेक वर्षांपासून नागरिक राहतात. त्यांनादेखील गुंठेवारीअंतर्गत घरे नियमित करून देण्याची संधी द्यावी, अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र, अद्याप अंमलबजावणी झालेली
नाही. नगरसेवक बाळासाहेब मुंडे यांनी सध्या एकाच बँकेत चलन भरण्याची सोय असल्याने नागरिकांची गर्दी होत असल्याचे सांगत, जास्तीत-जास्त बँकांमध्ये चलन भरण्याची सोय करून देण्याची मागणी केली.














