जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने जीवनदान महाकुंभ
सिल्लोड, (प्रतिनिधी) जगदुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने जीवनदान महाकुंभ आयोजित करण्यात आला असुन, बुधवार (दि. ७) रोजी आमठाणा (ता. सिल्लोड) येथील रक्तदान कॅम्प मधे ८२२ दात्यांनी विक्रमी नोंद केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
जगदुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने विविध प्रकारचे सामाजिक बांधिलकी जपत विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. मरणोत्तर देहदान, अवयवदान, वृक्षारोपण, वनाराई बंधारे, तसेच गरजुंच्या मदतीसाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध उपक्रमातुन सदैव मदत केली जाते. जगदुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने ४ जानेवारी ते १८ जानेवारी २०२५ जीवनदान महाकुंभ २०२६ चे आयोजन करण्यात आले.
आमठाणा (ता. सिल्लोड) येथे आयोजित रक्तदान कॅम्पमध्ये ८२२ दात्यांनी विक्रमी नोंद करून तालुक्याचे, जिल्हयाचे नाव लौकीक केले. सकाळी ९ वा. जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे पूजन करुन मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीराला सुरुवात झाली. इच्छुक दात्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे दिडशेपेक्षा जास्त महिलानी सुध्दा स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. आदर्श ब्लड बँकच्या टिमच्या मदतीने रक्तसंकलन करण्यात आले. शिबीर यशस्वी होण्यासाठी रामानंद संप्रदाय तालुका सेवा समितीचे आजी माजी पदाधिकारी, मक्त, शिष्य, साधक आदिंनी विशेष परिश्रम घेतले.
सिल्लोड तालुक्याची विक्रमी कामगिरीचे कौतुक :
जगगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्य प्रेरणेने २०२५ मधे झालेल्या रक्तदान महाकुंभात सिल्लोड तालुक्यात २६०० एवढया दात्यांनी रक्तदान केले केले. तर पालोद येथे झालेल्या रक्तदान शिबीरात एका दिवसात ११६० दात्यांनी रक्तदान करून विक्रम नोंदवत तालुक्याचे नाव लौकीक केले. डिसेंबर महिन्यात वनराई बंधारे (कच्चे बंधारे) उपक्रम राबविण्यात आले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्हाने सर्वाधिक बंधारे तयार केले आणि प्रथम क्रमांक मिळला यात सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक १८५ कचे बंधारे तयार करत प्रथम क्रमांक मिळवला. तर सेवा केंद्र पिंपळगाव घाट यांनी श्रमदानातून ३८ बंधारे बांधुन क्रमांक मिळवला. या कामगिरीबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे.
रक्तदानामुळे यांचे आयुष्य वाचणार :
मायक्रोसाइटिक अॅनिमीया, सिक्वेल, थैलेसिमिया, हिमोफिलीया, बल्ड कॅन्सर, किडनी फेल्युअर, तसेच शस्त्रक्रिया अपघातग्रस्त रुग्णांना जीवदान मिळणार.
येथे होणार रक्तदान :
रविवार दि. ११ (तळणी) शुक्रवार दि. १६ (पालोद) (रहिमाबाद) शनिवार (गोळेगांव), (पिंपळदरी) दि.१८ शनिवार (उंडणगांव), सिल्लोड.
जीवनदान महाकुंभ २०२६













