कन्नड, (प्रतिनिधी): चारा कुट्टी करणाऱ्या मशिनचा भोंगा अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १४) दुपारी शिरसगाव शिवारात शेतीकाम करताना घडली. सुखराम लक्ष्मण मोरे (रा. शिरसगाव, ता. कन्नड) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सुखराम मोरे शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिरसगाव शिवारातील गट क्रमांक १३२ मधील स्वतःच्या शेतात चारा कुट्टी करत होते. यावेळी अचानक कुट्टी मशिनचा भोंगा (ब्लोअर) तुटला आणि तो थेट सुखराम कन्नड तालुक्यातील शिरसगाव
येथील घटना यांच्या अंगावर आदळला. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. नातेवाईकांनी त्यांना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी उलफत परदेशी यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सुखराम मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी गोपीचंद हरचंद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.











