देशविघातक कृत्यांच्या संशयावरून वाळूजमध्ये एनआयएचा छापा बोगस ओळखपत्रे आणि व कनेक्शनच्या संशयावरून एकाला घेतले ताब्यात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी (दि. २९) पहाटे वाळूज परिसरात धडक कारवाई करत छापा टाकला. जवळपास आठ ते दहा तास चाललेल्या या गोपनीय व कसून चौकशीत तपास यंत्रणांच्या हाती मोठे धागेदोरे लागल्याची शक्यता आहे. या कारवाईदरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून बोगस राष्ट्रीय ओळखपत्रे, घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्याचे थेट पाक कनेक्शन असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याने
संपूर्ण शहरात आणि औद्योगिक क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
वाळूज गावातील कमळापूर-रांजणगाव रस्त्यावरील एका नव्याने उभारलेल्या इमारतीला एनआयएच्या पथकाने कडेकोट वेढा घातला होता. या पथकात एका महिला अधिकाऱ्यासह चार अधिकारी आणि कमांडोंचा समावेश होता. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही गुप्त मोहीम राबवण्यात आली. या इमारतीत परराज्यातील काही नागरिक आणि एक मोटार मेकॅनिक राहत असून, त्यांच्या संशयास्पद हालचालींवर केंद्रीय यंत्रणांची बारीक नजर होती.
ज आरोग्य केंद्र
१५ दिवसांपूर्वीच १३ जणांची चौकशी
अवघ्या पंधरा दिवसापूर्वीच एटीएस आणि आयबीने पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि डोग्रा गँगशी लागेबांधे असल्याच्या संशयावरून एमआयडीसी वाळूज व जुन्या शहरातून १३ जणांना ताब्यात घेतले होते. त्या कारवाईशी या छापेमारीचा काही संबंध आहे का, यादृष्टीनेही तपास सुरू आहे. तपास यंत्रणांनी अद्याप या कारवाईला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.