शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे हंडा-ढोल आंदोलन

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): वाढती महागाई आणि शासनाचे सातत्याने होणारे दुर्लक्ष याच्या निषेधार्थ शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वतीने शुक्रवारी (दि. २९) दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त महिला व पुरुष आंदोलकांनी साडी नेसून, डोक्यावर हंडा घेऊन आणि ढोल वाजवत शासनाविरोधात जोरदार - घोषणाबाजी केली.
आंदोलनकर्त्यांनी विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले. गेल्या २० वर्षांपासून तुटपुंज्या मानधनावर काम
करणाऱ्या या कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ २५,००० रुपये असून, त्यांना दिवसाला फक्त ८४ रुपये रोज मिळतो. आजच्या तीव्र महागाईच्या काळात ८४ रुपयांत घर संसाराचा गाडा कसा चालवायचा? मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न आणि घरातील सदस्यांच्या उपचाराचा खर्च कसा भागवायचा? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांना सादर करण्यात आल्या आहेत.
र मेळावा गयार राज्य
शिव की शालेय पोषण आहार
धरणे आंदोलन