साडेसहा लाखांची लाच घेताना अंबडच्या तहसीलदाराला अटक

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करू देण्यासाठी ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड पथकाने रंगेहाथ अटक केली. शनिवारी (दि. ६) सायंकाळी छत्रपती संभाजीनगरमधील बीड बायपास येथील त्याच्या निवासस्थानाबाहेर ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या ६ हायवा आणि पोकलेन मशीनवर कारवाई न करण्यासाठी चव्हाणने १२
घराचीही झाडाझडती
▶ तहसीलदार विजय चव्हाण याला अटक केल्यानंतर एसीबीच्या पथकाने तातडीने त्याच्या घराची झडती सुरू केली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या झाडाझडतीत चव्हाणकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता आणि रोकड सापडण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
लाख रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. यापूर्वी तक्रारदाराने ८ लाख रुपये दिले होते.
उर्वरित ४ लाख आणि पुढील वाहतुकीचे २ लाख ४० हजार, अशा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांसाठी चव्हाणने तगादा लावला होता. वैतागलेल्या तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार
केली. शनिवारी प्रशिक्षणासाठी आलेल्या चव्हाणने पैसे घेऊन बीड बायपास येथील कासलीवाल मार्वल सोसायटीत बोलावले. गेटवर लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीने त्याला अटक केली. सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions