तरुणीचा पाठलाग करून बंदुकीने ठार मारण्याची धमकी

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची भर रस्त्यात छेड काढत तिला बंदुकीने ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना औरंगपुऱ्यातील एका महाविद्यालयासमोर घडली. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला अटक केली. राजरत्न विष्णू पंतिंगराव (वय २७, रा. नारळीबाग) असे आरोपीचे नाव आहे.
जालना जिल्ह्यातील २१ वर्षीय तरुणी मैत्रिणींसोबत वेदांतनगर भागात राहते. औरंगपुरा परिसरात रोज स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी
अभ्यासिकेत एक जाते. वर्षापासून तो तरुणीचा पाठलाग करत होता.
त्याने काही दिवसांपूर्वी तिचा मोबाइल क्रमांक मिळवत तिला वारंवार मेसेज करून त्रास दिला. १ जून रोजी तरुणी अभ्यासिकेत गेली. त्यावेळी दुपारी अभ्यासिकेतून ती बाहेर येताच राजरत्नने तिला अडवत प्रेमाला होकार दे, नसता बंदुकीने ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे तरुणी घाबरली. ५ जून रोजी या प्रकरणी तिने क्रांती चौक पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुधाकर पाटील यांनी राजरत्नला अटक केली.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions