लाकडी दांड्याने पोटच्या मुलानेच केली पित्याची हत्या

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : कटकटगेट परिसरातील बाबर कॉलनीमध्ये कौटुंबिक नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून पोटच्या मुलानेच लाकडी दांड्याने डोक्यात जोरदार प्रहार करून आपल्या पित्याचा निघृण खून केला. ही थरारक घटना मंगळवारी (दि. ९) सकाळी घडली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मती (मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. बाबर कॉलनी, कटकटगेट) असे मृत
पित्याचे आहे. मृताचा मोठा मुलगा शाहिन शेख मती शेख (वय २३) याने फिर्याद दिली. फिर्यादीसह त्याचा भाऊ आरोपी अजीऊल शेख आणि पिता मृत मती शेख असे तिघे बाबर कॉलनीतील शेख आमेर ऊर्फ बाबाभाई यांच्या घरात मागील सात महिन्यांपासून किरायाने राहतात. तिघेही कटकटगेट भागातील बाबा बेकरी येथे काम करतात.
फिर्यादी शाहिन हा मंगळवारी (दि.९) सकाळी झोपेतून उठून फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जात असताना त्याचे वडील वडील झोपलेले होते, तर भाऊ अजीकल शेख हा झोपेतून उठून बेडवर
नाव बसलेला होता. त्यानंतर साधारण सव्वासात वाजेदरम्यान फिर्यादी शाहिन हा बाथरूममधून बाहेर आला, तेव्हा वडील रक्ताच्या थारोळ्यात दिसले. तिथे रक्ताने माखलेला लाकडी दांडा दिसला, त्याचवेळी भाऊ अजीऊल शेख हा पळून गेला.
लोहमार्ग पोलिसांना अलर्ट
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक पोलिसांचे पथक आरोपी अजीऊल याच्या शोधासाठी रवाना केले होते. परंतु आरोपी खुनानंतर रेल्वेने पश्चिम बंगालला पळाला असावा, असा कयास बांधून पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी तत्काळ भुसावळ लोहमार्ग पोलिस आणि संपर्क करत आरोपी अजीउल याचे वर्णन कळविले होते. तपास पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions