छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
महापालिका आणि इंटॅक संस्थेतर्फे रविवारी (५ जुलै) छावणी मोहल्ला येथे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात ते नऊ या वेळेत हा उपक्रम केला जाणार आहे. शहागंज येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून हेरिटेज वॉकला सुरुवात होणार आहे. सराफा, धावणी मोहल्ला, पानदरीबा परिसरातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन
मंदिरे, उदासी आखाडा, भाई दयालसिंहजी गुरुद्वारा, तसेच शहराच्या सांस्कृतिक वारशाशी निगडीत असलेल्या ऐतिहासिक स्थळांचा अभ्यासपूर्ण परिचय या दरम्यान करून दिला जाणार आहे.
या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी नागरिकांना शहागंज, सराफा, धावणी मोहल्ला आणि पानदरिबा परिसरातील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, उदासी आखाडा, भाई दयासिंहजी गुरुद्वारा तसेच
शहराच्या सांस्कृतिक वारशाशी निगडित अनेक ऐतिहासिक स्थळांचा अभ्यासपूर्ण परिचय करून देण्यात येणार आहे. या परिसरातील वास्तुकला, परंपरा आणि इतिहासाची माहिती तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष स्थळांवर देण्यात येईल. इतिहासप्रेमींनी, विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त अंकुश पांढरे, सहाय्यक आयुक्त ऋतुजा पाटील यांनी केले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













