मित्राची हत्या केलेल्या फरार आरोपीला उज्जैनच्या महामार्गावर जेरबंद

Foto

छत्रपती संभाजीनगर,
(सांजवार्ता ब्युरो) : दारूच्या नशेत स्वतःच्याच मित्रावर प्राणघातक - हल्ला करून त्याचा खून करणाऱ्या - दोन फरार आरोपींना बेड्या ठोकण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे.
यातील एका आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन
महामार्गावर पाठलाग करून अटक केली, तर पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे दुसऱ्या आरोपीने सोमवारी सातारा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
दीपक कसबे आणि विकी घनघाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, न्यायालयाने त्यांना अनुक्रमे
दुसऱ्या आरोपीची शरणागती
एका आरोपीला अटक झाल्याचे समजताच आणि पोलिसांचा ससेमिरा मागे लागल्यामुळे दुसरा आरोपी विकी घनघाव याने पळून जाणे अशक्य असल्याचे पाहून सोमवारी स्वतःहून सातारा पोलीस ठाणे गाठत शरणागती पत्करली. पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपी दीपक कसबे याला ८ जुलैपर्यंत, तर विकी घनघाव याला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या हत्येमागचे नेमके कारण काय होते, याचा पुढील तपास सातारा पोलीस करत आहेत.
८ आणि ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रकाशवर हल्ला केल्यानंतर दोन्ही आरोपी शहरातून फरार झाले होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दोघेही सुरुवातीला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे पळून
गेले होते. सातारा पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर होते. दरम्यान, एक आरोपी दीपक कसबे हा वाराणसीहून उज्जैन महामार्गावरून जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी त्याला महामार्गावरच सापळा रचून ताब्यात घेतले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions