बजाजनगरात गॅस गळतीमुळे उडाला गोंधळ; नागरिकात भीती

Foto
सोमवारी (दि.६) छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): बजाजनगर परिसरातील हायटेक कॉलेजसमोर सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्य पीएनजी गॅस वाहिनीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. वर्दळीच्या रस्त्यावर गॅसचा तीव्र वास पसरल्याने आणि आवाज येत असल्याने परिसरात काही काळ मोठा गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
या वेळी झालेल्या गॅसगळतीमुळे जवळपास दोनशे ते तीनशे फुटांचा परिसर गरम झाला होता. त्यातून गॅस बाहेर पडत असल्याने गॅसपुरवठा बंद करून रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती सुरू होती. गॅसगळतीमुळे गॅसगळतीमुळे बजाजनगर येथे काही काळ गोंधळ
उडाला. याची माहिती मिळाल्यावर विशाल खंडागळे, बजरंग पाटील, मनोज जैन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी याची माहिती एमआयडीसीचे अधिकारी यांना माहिती दिली; तसेच महावितरणचे नंदकुमार घुगे, नीलेश लोखंडे, खलील शेख यांनी प्रसंगावधान राखून या भागातील वीज पुरवठा खंडित केला. तसेच एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. गॅसगळती सुरू असताना एमआयडीसीतील कामगारांची शिफ्ट सुटल्याने रस्त्यावर वाहनांची व कामगारांची मोठी गर्दी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. रात्री आठ वाजेच्या सुमारास गॅस लाइनचा पुरवठा बंद करून पीएनजी गॅस कंपनीच्या यंत्रणेने दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू केले होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions