घाटीत ब्रॉन्कोस्कोपीने वाचला चिमुकल्याचा जीव

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पैठणगेट परिसरातील अवघ्या महिन्यांच्या चिमुकल्याने खेळताना चुकून बारीक खडा गिळला. परिस्थिती गंभीर होताच घाबरलेल्या नातेवाइकांनी मध्यरात्री बाळाला तातडीने घाटीत दाखल केले. तपासणीनंतर कान-नाक-घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी तत्काळ ब्रॉन्कोस्कोपीचा निर्णय घेत डाव्या मुख्य ब्रॉन्कसमध्ये अडकलेला दगड यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आला. यानंतर बाळाची ऑक्सिजन पातळी सुरळीत झाली अन चिमकुल्याचा जीव वाचला.
आव्हानात्मक परिस्थितीतही त्वरित निर्णयक्षमता आणि प्रभावी टीमवर्कच्या जोरावर वैद्यकीय पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. या प्रक्रियेत व्याख्याता डॉ. अदीब हुसेन, वरिष्ठ निवासी डॉ. गिरिजा जालनापुरकर, कनिष्ठ २ निवासी डॉ. कल्याणी, डॉ. उत्कर्ष, डॉ. ऋतुजा आणि डॉ. तुषार यांचे योगदान लाभले. भूल व्यवस्थापनासाठी अ‍ॅनेस्थेसिया विभागातील डॉ. गणेश निकम आणि डॉ. अनिसा यांनी जबाबदारी पार पाडली. बालरोग विभागातील प्राध्यापक डॉ. प्रभा खैरे यांनी उपचारादरम्यान आवश्यक मार्गदर्शन केले.