रिक्षा खरेदीच्या व्यवहारातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नारेगाव परिसरात रिक्षा खरेदीच्या व्यवहारातून बावीसवर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना २८ रोजी घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. अकेफ पठाण असे जखमीचे नाव असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी आरोपी साजीद बिब्बन मणियार (रा. कुरेशी पार्क, नारेगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहेमानिया
कॉलनीतील अकेफ पठाण याने जानेवारीमध्ये साजीदकडून ९० हजारात रिक्षा खरेदी करण्याचे ठरले होते. त्यासाठी त्याने ७० हजार आगाऊ दिले होते. उर्वरित २० हजार रुपये न देऊ शकल्याने हा व्यवहार रद्द झाला. साजीदने २९ हजार रुपये परत केले; मात्र ४१ हजार रुपये देण्यास तो टाळाटाळ करत होता. २८ मे रोजी रात्री साजीदने पैसे देण्याच्या बहाण्याने अकेफुला कुरेशी पार्क परिसरात बोलावून घेतले. तेथे दोघांमध्ये हाणामारी झाली. साजीदने अकेफच्या गळ्यावर कोयत्याने वार केले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions