मित्राच्या बहिणीला छेडल्याच्या संशयातून विद्यार्थ्याचा खून

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मित्राच्या बहिणीची छेड काढल्याच्या संशयावरून अनिकेत अरुण राठोड (१७, रा. शेवगा, ता. छ. संभाजीनगर) या पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्याची धारदार चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना शुक्रवारी (२९ मे) सायंकाळी दुधड लाडसावंगी मार्गावरील
दुधड शिवारात घडली.
या प्रकरणी करमाड पोलिसांनी श्रीकांत विलास राठोड (२०) आणि अमोल संजय चव्हाण (दोघे रा. शेवगा) यांना अटक केली. मात्र घटनेचा मुख्य संशयित सूत्रधार ओमकार मधुकर ताकपिरे (रा. फेरण जळगाव) हा फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके खाना
करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार, अनिकेत रोटेगाव येथील महाविद्यालयात शिकत होता. संशयित आरोपी गेल्या महिनाभरापासून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. शुक्रवारी त्याला फोनवर
जाणीवपूर्वक दुधड शिवारात बोलावण्यात आले.
तेथे झालेल्या वादावादीनंतर आरोपींनी अनिकेतच्या पोटात चाकूने गंभीर वार केले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृताचा भाऊ कुणाल राठोड याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी शेवगा येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात अनिकेतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions