'हरित व स्वच्छ संभाजीनगर' उपक्रमाचे उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महानायक सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे आपलं छत्रपती संभाजीनगर, हरित व स्वच्छ संभाजीनगर या
अशी असेल मोहीम
▶ या मोहिमेअंतर्गत शहरात स्वच्छता अभियान, वेस्ट टू बेस्ट सेंटर, कापडी पिशवी केंद्र, स्वच्छ प्रभाग उपक्रम, पथनाट्य आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाईल. नागरिकांनी आपल्या सोसायटीत वृक्षारोपण करावे, किमान ५ व्यक्तींना या मोहिमेत जोडावे, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सायकलचा वापर वाढवावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
मोहिमेचे उद्घाटन मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनिल मकरिये, शिवाजी दांडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फक्त वृक्षारोपण न करता संवर्धन करणे
आणि परिसर स्वच्छ ठेवून शहराचे सौंदर्य टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक प्रा. सागर चाबुकस्वार यांनी केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













