सातारा-देवळाई परिसराला पाणी टंचाईचे चटके

Foto
सातारा-देवळाई परिसराला पाणी टंचाईचे चटके 
खासगी दरवाढीमुळे मनपा टँकरला वाढती मागणी; २ दिवसांत ११५ टँकरची नोंदणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील नो-नेटवर्क भागातील नागरिकांना महापालिका प्रशासनाकडून टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जाते. पावसामुळे यंदा पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले असून, ऑक्टोबर महिन्यातच बोअरवेल आटू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना खासगी टँकर आणि जारच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच खासगी टँकरचालकांनी दरवाढ केल्यामुळे आणि जारच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत असल्याने, नागरिकांनी आता महापालिकेच्या शुद्ध पाण्याचा टँकर मागवण्यावर भर दिला आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल ११५ टँकरची नोंदणी झाली आहे.
कॉलनीमधील किमान १८ नागरिकांनी एकत्र येत १८ ड्रमची नोंदणी करणे
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions
महिनाभरात पाणी : महापौर
▶ सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांनी भेट देऊन तीव्र पाणीटंचाईची समस्या मांडली. यावर या भागात १० वाढीव टँकर सुरू करण्याचे आणि पुढील १५ दिवसांत टप्प्याटप्प्याने प्रत्येक कॉलनीत टँकरने पाणी देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तसेच महिनाभरात नवीन पाणी योजना पूर्ण करून थेट नळ कनेक्शनद्वारे घरांपर्यंत दररोज पाणी पुरवठा केला जाईल, असे माजी महापौर समीर राजूरकर यांनी स्पष्ट केले आहे.
आवश्यक असते. एका नागरिकाला यासाठी ३६६ रुपये भरावे लागतात.
महापालिका याद्वारे एक दिवसाआड एक ड्रम (२०० लिटर) पाणी घरापर्यंत पोहोचवते. नक्षत्रवाडी येथील मनपाच्या टँकर भरणा पॉईंटवर कंत्राटदारामार्फत ही नोंदणी केली जात असून, बीड बायपास रोडवरील बजाज हॉस्पिटलसमोरील झोन-८ कार्यालयात रक्कम भरल्यानंतर टँकर सुरू केले जातात. बुधवारी ६८ तर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४७टँकरची नोंदणी झाली.