बसस्थानकातील स्वच्छतागृहे आजपासून प्रवाशांसाठी मोफत

Foto

कंत्राटी कर्मचाऱ्यांची सुटी
महामंडळाने व्यवस्था ताब्यात घेतल्याने बसस्थानकांवर अनेक वर्षांपासून स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे काम थांबवण्यात आले आहे. रोज ४०० रुपये मजुरी मिळणाऱ्या या कामगारांची आता सुटी झाली असल्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी दिली.
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राज्यातील एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे आज, १ जूनपासून प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहेत. वारंवार होणाऱ्या तक्रारींची दखल घेत एसटी महामंडळाने खासगी कंत्राटदारांकडील ही व्यवस्था स्वतः च्या ताब्यात घेतली आहे. त्यामुळे
वापर शुल्कावरून कंत्राटदारांचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये होणारे वादाचे प्रसंग आता थांबणार आहेत. स्थानक परिसरातील स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची देखभाल अधिक सक्षम करण्यासाठी महामंडळाने १५ एप्रिलपासूनच तिकिटावर प्रतिप्रवासी २ रुपये स्वच्छता
अधिभार शुल्क आकारणे सुरू केले आहे.
या उत्पन्नातून आता महामंडळ स्वतः या सुविधांचे नियंत्रण व साफसफाई करणार आहे. या निर्णयामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
a
I
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions