कारवाई दरम्यान तब्बल ५ हजार ६१८ लिटर गावठी दारूचे रसायन आणि ४१९ लिटर तयार दारू, ड्रम व भट्टीचे साहित्य हस्तगत करून ते जागेवरव नष्ट केले. याप्रकरणी २० आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४ लाख ३३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जात केला आहे.
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)
जिल्ह्यातील दारू माफिया, गुटखा तस्कर आणि अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस दल मध्यरात्री रस्त्यावर उतरले. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या आदेशानुसार ६ जूनच्या रात्री संपूर्ण जिल्ह्यात ऑपरेशन ऑल आऊट ही धडक मोहीम
राबवण्यात आली. या मोहिमेत शेकडो ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करत पोलिसांनी ५५ गुन्हे दाखल केले असून, ७२ अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या धडक कारवाईत तब्बल १ कोटी १७लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
महाराष्ट
पोलीस
कोणाचीही गय करणार नाही
▶ जिल्ह्यात अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाहीत. कोणाचीही गय केली जाणार नाही. यापुढेही अचानक नाकाबंदी, कोंबिंग ऑपरेशन आणि ऑपरेशन ऑल आऊट राबवून कारवाया केल्या जातील. नागरिकांनी अवैध धंद्याबाबत माहिती द्यावी.
प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक
जिल्ह्यात रात्रीच्या अंधारात चोरट्या मागनि वाळू तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या चालक-मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले. आता या वाहनांचे आणि चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवण्यात
येणार आहे. तसेच पोलिसांनी दारूची अवैध विक्री आणि साठवणूक करणाऱ्या १८ तस्करांना हिसका दाखवत जुगार खेळणाऱ्या २१ आरोपींना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ड्रंक अँड ड्राईव्हच्या तीन केसेस करण्यात आल्या. खुलताबाद पोलिसांनी गुटखा माफियांना ताब्यात घेतले.













