बॉटनीकल गार्डनमध्ये योग शिबीर उत्साहात

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे उद्यान (बॉटनिकल गार्डन) येथे विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विवेक देशपांडे, डॉ. उत्तमराव काळवणे, संजय औरंगाबादकर, कैलास जाधव, दिनेश देशपांडे, सुरेश देशपांडे, आनंद अग्रवाल, वर्षा देशपांडे, भाऊ सुरडकर, नगरसेवक शिवाजी दांडगे, नगरसेवक विश्वनाथ स्वामी, नगरसेविका माधुरी अदवंत, मीना खरात, नगरसेवक मयूर वंजारी,
गणेश नावंदर, गोकुळ मलके, राजू वाडेकर, प्रशांत नांदेडकर, नितीन खरात, अरुण पालवे, अविनाश पवार, रोहित स्वामी, सुधीर शेवाळे, हुशारसिंग चव्हाण, विशाल खंडागळे, आकाश अंतरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते तसेच निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले. विविध योगासनांचे प्रात्यक्षिक तसेच सामूहिक योगाभ्यासात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions