छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, मिठाई विक्रेते आणि इतर अन्न व्यावसायिकांची अन्न व औषध प्रशासनातर्फे अचानक तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेत नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. दूषित अन्नामुळे एखाद्या ग्राहकाचा मृत्यू झाल्यास थेट जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद कायद्यात करण्यात आली असून, परवान्याशिवाय व्यवसाय करणे आणि अस्वच्छता राखल्यास लाखो रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
शहर व जिल्ह्यातील रेस्टॉरंट, हॉटेल आणि मिठाई विक्रेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुंढे यांनी जारी केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. व्यावसायिकांना अन्न सुरक्षा कायद्यातील नव्या तरतुदी, स्वच्छतेचे निकष, ग्राहकांच्या हक्कांबाबत तसेच नियमांचे पालन न केल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईची माहिती देण्यात आली. तपासण्यांमध्ये
अन्न सुरक्षा आयुक्त मुंढेंच्या आदेशानंतर 'एफडीए' अॅक्शन मोडमध्ये
अनेक ठिकाणी परवान्याशिवाय व्यवसाय, अस्वच्छ स्वयंपाकगृहे, वापरलेले तेल पुन्हा वापरणे, तसेच ग्राहकांना सक्तीने बाटलीबंद पाणी विकण्याचे प्रकार आढळून आले होते. याची गंभीर दखल घेत नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. नवीन नियमांनुसार वैध परवाऱ्याशिवाय व्यवसाय केल्यास १० लाख रुपर्यापर्यंत दंड, अवमानक अन्त्र विक्रीस ५ लाख रुपये, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी अस्वच्छतेस १ लाख रुपये, तर १० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. दूषित अन्नामुळे ग्राहकाचा मृत्यू झाल्यास सात वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत कारावास आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. पुनरावृत्ती झाल्यास दंड दुप्पट करून परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचीही तरतूद आहे. बैठकीला सहायक आयुक्त दयानंद पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका झाडे यांच्यासह अन्न सुरक्षा विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions











