९ लेआउटमधील खुणांसह बांधकामे जमीनदोस्त; भूमाफियात खळबळ
छत्रपती महापालिकेने संभाजीनगरः अनधिकृत प्लॉटिंगविरोधात सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई सत्र सुरूच ठेवले. गुरुवारी (दि. २०) पडेगाव-मिटमिटा परिसरातील नऊ अनधिकृत लेआउटमधील सुमारे ९२० प्लॉटच्या खुणा आणि इतर अवैध बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. या मोठ्या कारवाईमुळे बेकायदेशीर लेआउट पाडणाऱ्या भूमाफिया आणि जमीनमालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
महापालिका आयुक्तांच्या
सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता लेआउट तयार करून भूखंड पाडणे अथवा त्यांची विक्री करणे नियमांचे उल्लंघन आहे. केवळ अनधिकृत प्लॉटिंग हटविण्यावर न थांबता संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अनधिकृत प्लॉटिंगविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे.
आदेशानुसार मुख्य अतिक्रमण सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी पडेगाव-मिटमिटा परिसरातील अवैध प्लॉटिंगवर कारवाई करण्यात आली. यावेळी गट क्रमांक १५६, १५८, ९८/२, २९, १११, ११०, ११२ आणि ११३ या ठिकाणी विकसित करण्यात आलेल्या
नऊ अनधिकृत लेआउटवर पथकाकडून बुलडोझर फिरवण्यात आला. तसेच सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता जमिनीवर प्लॉट पाडून त्यांची मार्किंग करण्यात आली होती.
यासह काही ठिकाणी अनधिकृत बांधकामेही उभारण्यात आली होती. मनपाच्या पथकाने
संतोष वाहूळे, अतिक्रमण सनियंत्रण अधिकारी मनपा
जेसीबीच्या साहाय्याने प्लॉटच्या खुणा व बांधकामे हटविली. परवानगीविना लेआउट तयार करून भूखंड पाडणे आणि त्यांची विक्री करणे हे नियमबाह्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. या कारवाईत अतिक्रमण सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक मुकेश खडसे, रवींद्र
देसाई, नागरिक मित्र दल तसेच अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. अनधिकृत प्लॉटिंग प्रकरणात शिवनाथ ताठे, भारूका, शेख
JCB
रेहान अब्दुल रशीद आणि सय्यद खान ही नावे समोर आली आहेत. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.













