आरोपीला ३ महिन्यांची शिक्षा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ६ लाख रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात न्या. व्ही. एच. देशमुख यांनी आरोपी राजेंद्र गोविंद काळे यास दोषी ठरवत तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. फिर्यादी कमलबाई दशरथ अडमाणे यांना ८ लाख १६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश ८ जून रोजी देण्यात आले.
फिर्यादीच्या वतीने अॅड. सुधीर रशाळे यांनी युक्तिवाद करत आरोपीने व्यवसायासाठी वेळोवेळी हातउसने घेतलेल्या एकूण ६ लाख रुपयांच्या परतफेडीसाठी धनादेश दिला होता,
मात्र तो धनादेश बँकेत वटला नसल्याचे न्यायालयास निदर्शनास आणून दिले. तसेच फिर्यादीने बँक खात्यातील व्यवहार व इतर कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे आरोपीकडे सदर रक्कम देय असल्याचे सिद्ध केले.
याप्रकरणी कायदेशीर नोटीस बजावूनही आरोपीने रक्कम अदा केली नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. दोन्ही बाजूंचे पुरावे व युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीस तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावत फिर्यादीस ८ लाख १६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions