वसंत भवनसाठी महापौरांचा पुढाकार

Foto
भाजीमंडईनंतर दसरा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागणार
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी संभाजीपेठ भाजीमंडईचा प्रश्न मार्गी लावला. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे. आता वसंत भवनचा प्रश्नही महापौरांनी मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहराच्या विकासाला गती देण्यासाठी दोघांनीही थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत भेटीचा एक एक राऊंड पूर्ण केला आहे. दरम्यान, स्थायी समिती सभापतींनी रखडलेला बीओटी तत्त्वावरील भाजीमंडईचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर महापौरांनीही गुरुवारी (दि. २०) मनपा अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत त्यांनी वसंत भवन प्रकल्प कार्यान्वित करण्याचे स्पष्ट आदेश दिले. महापौरांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता वसंत भवनचा प्रलंबित विषयही लवकरच सुटेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांमधील विकासकामांची ही स्पर्धा
सध्या शहरवासीयांच्या दृष्टीने फलदायी ठरत आहे.
स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी संभाजीपेठेतील १४ वर्षांपासून रखडलेला भाजीमंडईचा प्रकल्प मार्गी लावला आहे. वसंत भवनही महापालिकेच्या बीओटी प्रकल्पांपैकी एक आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात दुकाने, गाळे आणि शॉपिंग मॉल उभारून महापालिकेच्या उत्पन्नात भर घालणारा हा प्रकल्प आहे. विकासक आणि महापालिका यांच्यातील वाद, न्यायालयीन प्रक्रिया आणि कायदेशीर मंजुरी आदींमुळे सुमारे १५ वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे. महापौर समीर राजूरकर यांनी आता या प्रकल्पासह इतर प्रकल्पांमध्ये लक्ष घालून ते कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुराणवस्तू संग्रहालय नूतनीकरण, वेदांतनगर आणि वसंत भवन येथील विविध विकास प्रकल्प, कांचनवाडीतील श्वान दफनभूमीचे काम, वर्किंग वुमन हॉस्टेल, दिव्यांग भवन, प्रधानमंत्री आवास योजना, प्रस्तावित पाच नवीन अग्निशमन केंद्र, रोशनी प्रकल्प, एन-८ रुग्णालय आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions