सरासरीच्या 121 टक्के पाऊस

Foto
 जून-जुलै या दोन महिन्यात तूफान वर्षाव करणार्‍या वरुण राजाने ऑगस्टमध्येही जिल्ह्यावर आभाळमाया कायम ठेवली आहे. गेल्या अकरा दिवसात सरासरीच्या 121 टक्के पाऊस जिल्ह्यात झाला. ऑगस्टमध्ये सर्वाधिक 174 मिमी पाऊस खुलताबाद तालुक्यात भरतला तर सर्वात कमी 92 मिमी सिल्लोड तालुक्यात झाला आहे.
 एक दशकभरानंतर यंदा जिल्ह्यात पहिल्या दोन महिन्यातच पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली. दरवर्षी जिल्ह्यातील जवळपास निम्मे तालुके अवर्षण ग्रस्त असतात.  जून आणि जुलै महिन्यात किमान दोन ते तीन आठवड्यांचे मोठे खंड ही पडत असत. या वर्षी मात्र जून पासून सुरू झालेल्या पावसाने अजूनही उसंत घेतलेली नाही. पावसाच्या दिवसात जवळपास 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वरुणराजाच्या कृपेने खरीप पिके जोमदार आली असून शेतकर्यात आनंदाचे वातावरण आहे.
जून-जुलैमध्ये 185 टक्के 
 दरम्यान जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात तब्बल सरासरीच्या 185 टक्के पाऊस पडला होता. सर्वाधिक 236 टक्के पाऊस वैजापूर तालुक्यात झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. त्याखालोखाल फुलंब्री 215 टक्के औरंगाबाद व गंगापूर तालुक्यात 206 टक्के, पैठण 204, कन्नड 192, खुलताबाद 188, सोयगाव 145 तर सिल्लोड तालुक्यात 130 टक्के पावसाची नोंद झाली. संपूर्ण जिल्ह्यात सरासरीच्या तब्बल 185 टक्के पाऊस या दोन महिन्यात रिचवला.
ऑगस्टमध्येही वर्षाव !
वरुणराजाने ऑगस्ट महिन्यातही आभाळमाया कायम ठेवल्याचे दिसते. गेल्या अकरा दिवसात जिल्ह्यात सरासरीच्या 121 टक्के पाऊस पडला आहे. सर्वाधिक 174 टक्के पाऊस गंगापूर तालुक्यात झाला. त्याखालोखाल पैठण 146 टक्के, खुलताबाद 139, वैजापूर 136, फुलंब्री 124, कन्नड 121, सोयगाव 108, औरंगाबाद 101 तर सिल्लोड तालुक्यात 92 टक्के पावसाची नोंद झाली आहे.
खुलताबाद तालुक्यात सर्वाधिक
एक जुलैपासून आतापर्यंत सर्वाधिक 729 मिमी पाऊस खुलताबाद तालुक्यात झाला आहे. त्याखालोखाल  औरंगाबाद 685 मिमी, फुलंब्री 617, कन्नड 608, गंगापूर 590,  पैठण 576, सोयगाव 572, वैजापूर 545, सिल्लोड तालुक्यात 440 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker