जिल्ह्यात आज सहाव्या दिवशीही २०२ रुग्णांची वाढ

Foto
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२३९ वर; २४३६ रुग्णांवर उपचार सुरू
 औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार सहाव्या दिवशीही पुन्हा २०२ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२३९ वर जाऊन पोहचली आहे. 

गेले सहा दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल पहाता २४ जून पासून प्रतिदिन दोनशेहुन अधिक रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात आजपर्यंत सहा दिवसांत जिल्ह्यात १३७० रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढतच चालली आहे. यात आज सकाळी २०२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये १२३ पुरूष, ७९ महिला आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५२३९ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी २५५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २४७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २४३६ रुग्णांवर उपचार सुरू आहे. 
औरंगाबाद मनपा हद्दीतील ११४ रुग्ण या भागातील
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ११४ रुग्ण मनपा हद्दीतील आहेत. त्यात देवळाई सातारापरिसर १, आंबेडकरनगर १, भीमनगर, भावसिंगपुरा २, जामा मस्जिद परिसर ४, हर्षलनगर १, मुकुंदवाडी ३, संजयनगर १, हिंदुस्तान आवास २, न्यू बालाजीनगर १, पुंडलिकनगर ४, सन्म‍ित्र कॉलनी १, शिवाजीनगर २, एन बारा २, नागेश्वरवाडी ५, काबरानगर, गारखेडा १, न्यायनगर ३, एन चार सिडको १, नवजीवन कॉलनी, हडको १, पहाडसिंगपुरा ५, मिल कॉर्नर १, बालाजीनगर ५, उत्तमनगर १, भाग्यनगर ७, नारेगाव ७, अजबनगर ३, जय भवानीनगर ४, न्यू हनुमाननगर १, शिवशंकर कॉलनी ४, बीड बायपास १, विजयनगर १, सिद्धार्थनगर १, नाईकनगर, बीड बायपास १, संभाजी कॉलनी १, अरिश कॉलनी ३, मुकुंवाडी १, एन दोन, सिडको ६, अविष्कार कॉलनी १, पिसादेवी -१, विसावानगर १, विठ्ठलनगर २, भिमाशंकर कॉलनी १, राजा बाजार २, ठाकरेनगर १, चिकलठाणा ३, जाधववाडी ३, कैलासनगर ३, एन अकरा, सिडको १, उल्कानगरी १, एन आठ, सिडको २, एन नऊ, सिडको १, इतर २ या भागात रुग्ण आढळून आले.
ग्रामीण भागातील ८८ रुग्ण या भागातील :
ग्रामीण भागात देखील ८८ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शाहूनगर, इसारवाडी, पैठण -१, शिवराई, वाळूज १, कन्नड २, वडनेर, कन्नड १, वरुडकाझी, करमाड ६, वाळूज सिडको, बजाजनगर १, म्हाडा कॉलनी, बजाजनगर १, बजाजनगर ११, कृष्णा कोयना सोसायटी बजाजनगर २, भगतसिंग शाळेजवळ, बजाजनगर २, नवजीवनधारा सोसायटी बजाजनगर २, श्रीराम नगर, म्हाडा कॉलनी, बजाजनगर २, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर ६, भवानी चौक, बजाजनगर २, गुलमोहर कॉलनी, बजाजनगर ३, शिवालय चौक, बजाजनगर १, संभाजी चौक, बजाजनगर १, सिडको वाळूज महानगर, बजाजनगर ४, बजाज विहार, बजाजनगर १, कृष्णामाई सोसायटी बजाजनगर ३, गणेश नगर, सिडको महानगर, बजाजनगर २, नवनाथ सोसायटी बजाजनगर १, देवदूत सोसायटी बजाजनगर १, तनवाणी शाळेजवळ, बजाजनगर १, गोकुळधाम सोसायटी बजाजनगर १, वाळूज हॉस्पीटल शेजारी, बजाजनगर १, नवनाथ सोसायटी बजाजनगर १, सप्तशृंगी मंदिराजवळ, बजाजनगर ३, अयोध्या नगर, बजाजनगर १, पन्नालाल नगर, पैठण २, बोजवरे गल्ली, गंगापूर २, वाळूज, गंगापूर २, भेंडाळा, गंगापूर २, शिवाजी नगर, गंगापूर २, दर्गावेस, वैजापूर १२, लासूरगाव, वैजापूर १, सारा पार्क वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker