नाथसागराचे सर्व दरवाजे उघडले

Foto
रात्री उशिरा पैठण शहरासह गोदाकाठच्या 14 गावात दवंडी ‘नागरिक भयभीत’ 
 94 हजार 320 क्यूसेक वेगाने विसर्ग
 नाथ सागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रातील गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचे धाबे दणाणले.दिवसा बंद करण्यात आलेले दरवाजे रात्री उशिरापर्यंत टप्प्या टप्प्याने सर्व उघडण्यात आले असून गोदावरी नदीच्या पात्रात जवळपास एक लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान नगर परिषदेमार्फत रात्री अकरा वाजेच्या सुमारास गावात लाऊडस्पिकरद्वारे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला अचानकपणे नगर परिषदेमार्फत अलाऊसमेंट  करून सावधानतेचा इशारा देण्यात आल्याने नदी, नाल्या लगत असलेल्या लोकांची धांदल उडाली व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले 1990 व 2006 च्या महापुराची आठवण नागरिकांना झाली.
दरम्यान रात्री 12 वाजेपासून अडीच वाजेपर्यंत नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी शहरातील विविध भागातील नाल्यांची पाहणी केली व पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शहरात पाणी शिरणार नाही याची दक्षता घेऊन पाण्याचा विसर्ग करण्यात यावे असे सांगितले व नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन लोळगे यांनी केले.नाल्या जवळ असलेल्या नागरिकांनी रात्रभर जागून आपापले सामान हलविण्यास सुरुवात केली होती. पैठणचे नाथ सागर जलाशय सलग दुसर्‍यांदा 100 % भरले आहे. 
रात्री 2:30 ते 3.00 दरम्यान गेट क्रमांक 1,9,5,3,7,2,8,4,6 हे आपत्कालीन नऊ गेट 1 फूट उंचीवर करण्यात आले तर 10,27,18,19,16,21,14,23,12,25,11,26,13,2415,22,17,20 हे 18दरवाजे चार फूट उंच करण्यात आले. दरम्यान 2006 नंतर पहिल्यांदाच सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहे. नाथसागराचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे सकाळ पासून याठिकाणी पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे त्यामुळे याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
90 टक्के धरण भरल्यानंतर दरवाजे उघडावे
1990 व 2006 मध्ये पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांच्या नियोजना अभावी नाथ सागर जलाशय शंभर टक्के भरल्यानंतर ही पाणी सोडण्यात आले नव्हते त्यातच नाथसागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली त्यामुळे नाथ सागर जलाशयाच्या तीन लाख क्यूसेक पेक्षा जास्त पाणी धरणात आले त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती केवळ पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या गलथान पणामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती आताही नाथसागर जलाशय 100% टक्के भरल्यानंतर पाणी सोडले. नाथसागर जलाशय 85 टक्के भरल्यानंतर चानकवाडी जवळ असलेल्या निम्न बंधार्‍याचे दरवाजे उघडण्यात यावे व नाथ सागर जलाशय 90% भरल्यानंतर दरवाजे उघडावे असा नियम आहे परंतु पाटबंधारे विभागाचे अधिकारी हे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी करताना दिसत आहे. यामुळे याचा फटका नागरिकांना, व्यापार्‍यांना होत आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे
नाथ सागर जलाशयाची पाणी पातळी 
8 धरणाची पाणी पातळी:- 1521.90 फूट, 463.875 मीटर
8 एकूण पाणी साठा:- 2897.100 दलघमी
8 जिवंत पाणी साठा:-2158.994 दलघमी
8 आवक:-37662 क्यूसेक
8 धरणाची टक्केवारी:-99.44%
8 उजवा कालवा विसर्ग:-300 क्यूसेक, 
8 सांडव्यातून 94,320 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.
गोदाकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा 
जायकवाडी धरणाचे सगळे दरवाजे आता दोन फुटांनी उघडले गेले आहेत. त्यामुळे तब्बल एक लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता गोदाकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. ऊर्ध्व भागातील धरणातून व जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातुन येणार्‍या पाण्याची आवक वाढत आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या सांडव्यामधुन गोदावरी नदीपात्रात 1 लाख क्युसेक विसर्ग होऊ शकतो. गोदावरी नदीकाठच्या गावकर्‍यांनी नदीपात्रातील चल मालमत्ता, चीज वस्तु, वाहने, जनावरे, पाळीव प्राणी, शेती औजारे व इतर साधने सुरक्षित ठिकाणी न्यावीत, नदीपात्रात कोणीही जाऊ नये व कुठलीही जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker