ट्रम्प यांच्या विरोधात अटक वॉरंट !

Foto
कमांडर जनरल कासिम सुलेमानी हत्ये प्रकरणी इराणने आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात थेट अटक वॉरंट जारी केले आहे. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कासीम सुलेमानी मारले गेले होते.  इराण आणि अमेरिकेतील संबंध आणखीच ताणले गेले असून इराण सरकारने   ट्रम्प यांच्याशिवाय इतरही अमेरिकन अधिकाऱ्यांविरोधात वॉरंट काढले आहे. इराणने ट्रम्प यांना अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत मागितली आहे. याबाबत सरकारी वकील अली अलकसिमेर यांनी सांगितले की, ट्रम्प आणि अन्य ३० हून अधिकजणांनी ३ जानेवारी रोजी सुलेमानी यांच्यावर ड्रोन हल्ला केला. या प्रकरणातील त्यांचा सहभाग असल्याचा इराण सरकारचा आरोप आहे. ट्रम्प यांच्यासह इतरांवर हत्या करणे आणि दहशतवादाचा आरोप ठेवण्यात आला आहे. ट्रम्प यांच्याशिवाय अन्य आरोपींबाबत कोणाचेही नाव सरकारी वकील अली यांनी जाहीर केले नाही. ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आल्यामुळे इराण-अमेरिकेतील तणाव वाढवण्याची शक्यता आहे. याआधीच ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली होती. इराण सरकारने डोनाल्ड ट्रम्प आणि अन्य आरोपींविरोधात उच्चस्तरीय रेड नोटीस काढण्याची विनंती इंटरपोलला केली आहे. मात्र, इंटरपोलने याबाबत काहीही भाष्य केले नाही. इंटरपोलच्या नियमानुसार, राजकीय कृतीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत इंटरपोल सहभागी होऊ शकत नाही. इंटरपोल लवकरच अधिकृत भूमिका जाहीर करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला इराणने रिवोल्यूशनरी गार्डचे कमांडर जनरल कासिम सुलेमानी यांची गुप्त माहिती अमेरिका आणि इस्राएलला देणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे इराण सरकारने जाहीर केले होते. ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाल्यानंतर इराणने याचा सूड घेण्याचा जाहीर केले होते. त्याशिवाय, इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर रॉकेट हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला होता. या तणावातूनच इराणकडून युक्रेनचे प्रवासी विमान पाडले गेले होते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker