पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेसची निदर्शने

Foto
पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत असल्याने  सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत असून किमतींवर नियंत्रण राखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदाच्या नियुक्तीनंतर  काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेले हे पहिलेच आंदोलन असल्याने कार्यकर्त्यात मोठा उत्साह होता. गेल्या महिनाभरापासून  देशात  पेट्रोल डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ होत आहे. आधीच कोरोना संकटाने हवालदिल झालेल्या नागरिकांवर  दरवाढीचा बोजा टाकत केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचेच काम केले. पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर नियंत्रण राखण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे यांनी यावेळी केला. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून काँग्रेस जिल्हाभर आंदोलन करण्यात आल्याचे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, प्रकाश मुगदिया, डॉ.जितेंद्र देहाडे, किरण डोणगावकर, अनिल मालोदे, अकील पटेल, गौरव जैस्वाल, सरोज मसलगे, राहुल सावंत आदींची उपस्थिती होती.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker