मेंढपाळ मृत्यूप्रकरणी धनगर समाज आक्रमक

Foto
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार 
शासकीय मदत द्या स आरोपींना अटक करा
 भोकरदन तालुक्यात मेंढपाळ चुलत्या- पुतण्यावर  झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात चुलत्याच्या मृत्यू नंतर धनगर समाज आक्रमक झाला असून आरोपींना तात्काळ अटक करा, मृताच्या नातेवाईकांना शासकीय मदत देऊन नोकरीत सामावून घेण्याचे  ठोस आश्वासन जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेकवाईकांनी नकार दिला आहे.त्यामुळे औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात तणाव निर्माण झालो आहे.
रामदास कडूबा जोशी वय-40 (रा.निपाणी चिंचोळी, ता.भोकरदन, जि. जालना) असे मृताचे नाव आहे तर योगेश जोशी असे जखमी पुतण्याचे नाव आहे.या दोघांवर 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी निपाणी येथे हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत दोन्हीवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान  साडेतीन वाजेच्या सुमारास  जखमी  रामदास यांचा मृत्यू झाला. त्यानंतर धनगर समाजाचे राज्यातील अनेक नेत्यांनी औरंगाबाद गाठले आज सकाळ पासून घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गुहा समोर मोठ्या प्रमाणात समाज बांधव यांनी घोषणाबाजी केली. मेंढपाळांना शस्त्र परवाना देण्यात यावा, हल्‍ला करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करावी, मृताच्या नातेवाईकांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,  या सर्व मागण्या ठोस पणे जो पर्यंत  मान्य होणार नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.दुपार पर्यंत पोलीस आंदोलक आणि नातेवाईकांची समजूत घालत होती.या वेळी रामनाथ मंडलिक, सुरेश कांबळे, शशिकांत तरंगे, रामभाऊ लांडे, संदीप घोगरे, संजय तागड, सुरेश डोळझाके, शैलेश लबाडे, रंगनाथ राठोड, संजय फंटागडे, कैलास रिठे, दिलीप रिठे  यांच्या सह समाज बांधवांची उपस्थिती होती.