हाताची मेहंदी मिटण्याअगोदरच भरबाजारात नावविवाहितेचा गळा चिरला....

Foto
एकतर्फी प्रेमप्रकरणातून मंठ्यात भरदिवसा थरारनाट्य.....

 अवघ्या चार दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं.. हाताची मेहंदी देखील मिटली नव्हती... लग्नांन्तर पहिल्यांदाच माहेरी आली आणि बाजारात खरेदी करीत असताना एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून नवविवाहितेचा भरबाजारात गळा चिरून तिचा खून केला. मंठा शहरातील बाजारपट्ट्यात भरदिवसा हा थरारनाट्य घडलाय. मनाला सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे मंठा शहरात एकच खळबळ माजलीय.

वैष्णवी नारायण गोरे वय-20 वर्ष(रा.मंठा शहर) असे  हत्या झालेल्या नावविवाहितेचे नाव आहे तर शेख अल्ताफ शेख बाबू (रा.मंठा) असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

मृत तरुणीचा 4 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. लग्नांन्तर ही नवविवाहिता पहिल्यांदाच 30 जून रोजी माहेरी परतली होती. दरम्यान,  खरेदी करण्यासाठी ती मनठ्यातील बाजारपट्ट्यात गेली असता आरोपी शेख अल्ताफ शेख बाबू  या माथेफिरू तिथे आला आणि काही काही कळण्याच्या आतच त्याने आपल्या हातातील धारदार चाकूने त्या नवविवाहितेचा गळा चिरला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सदर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, एकतर्फी प्रेम प्रकरणातून हा थरारनाट्य घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून याप्रकरणी मंठा पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे . उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांगर आणि पोलीस निरीक्षक निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलीय.पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या...

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker