चार वर्षीय चिमुकल्यासमोरच बापाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Foto
करमाडजवळील सेलूद येथील घटना
शेततळ्यात पोहण्याचा मोह एका तरुण शेतकर्‍यांच्या जीवावर बेतला विशेष म्हणजे ज्यावेळी तरुण पाण्यात बुडत होता त्यावेळी त्याचा चार वर्षीय चिमुकला तो सर्व प्रकार पाहत होता. ही घटना करमाड गावातील सेलूद शिवारात काल संध्याकाळच्या सुमारास घडली.
अनिल सुखदेव भालेराव (वय-26 रा.सेलूद ता.जि. औरंगाबाद) असे मृत्यू पावलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. या घटने प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, काल संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अनिल हा त्याच्या चार वर्षीय मुलासह गावातील शेततळ्यात गेला होता. तेथे त्यास पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने कड्यावरील चिमुकल्याला शेततळ्याशेजारी बसविले व तो पाण्यात उतरला. काही वेळा नंतर तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला व क्षणात तो पाण्यात बुडाला.शेजारी बसलेला त्याचा चार वर्षीय मुलाने हा सर्व प्रकार पहिला व तो शेततळ्याशेजारी रडत बसला होता. गावकर्‍यांनी त्याला एकटे पाहून विचारपूस केली असता त्याने घडलेली घटना सांगितली ते ऐकून गावकर्‍यांच्या पाया खालची जमीन सरकली.तातडीने गावातील काही तरुणांनी शेततळ्यात उडी घेत अनिलला पाण्याबाहेर काढले व रुग्णालयात हलविले, मात्र घाटीतील वैधकीय अधिकार्‍यांनी तपासून अनिलला मृत घोषित केले. या प्रकरणी करमाड  पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार शंकर चव्हाण करीत आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker