आयुक्तांच्या तंबीनंतरही एमजीएमची हेकेखोरी!

Foto

रुग्णाला ठेवले ६ तास ताटकळत 

रुग्णाला तातडीने दाखल करून उपचार सुरू करा नसता कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्यावरही खाजगी रुग्णालयांची हेकेखोरी सुरूच आहे. एमजीएम रुग्णालयाने काल दुपारी एक वाजता गेलेल्या रुग्णाला तब्बल ६ तास ताटकळत ठेवले. या काळात रुग्णाचे काही बरेवाईट झाले असते तर जबाबदारी कोणाची ? असा प्रश्‍न आता उपस्थित झाला आहे.
अशक्तपणा जाणवू लागल्याने काल दुपारी एक वाजता एक ५२ वर्षीय व्यक्ती आपल्या मुलीसह एमजीएम रुग्णालयात दाखल झाला. मुलीने वडिलांना ऍडमिट करून घ्या अशी विनंती मुलीने केली. मात्र बेड नाहीत असे सांगून रुग्णालयाने नकार दिला. आता बेड कधी उपलब्ध होतील याची शाश्वती नसल्याचेही रुग्णालयाने सांगितले. इकडे वडिलांची तब्येत जास्त होत असल्याने तरुणी अस्वस्थ झाली. अखेर माजी महापौर बापू घडामोडे यांना तरुणीने फोन करून याबाबत माहिती दिली. तोपर्यंत तीन तास लोटले होते. घडामोडेंनी फोना फोनी केल्यावर दुपारी चार वाजता रुग्णाला ऑक्सिजन देण्यात आले. तरीही बेड नसल्याचे कारण सांगून दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. अखेर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना कळल्यावर त्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातले. मदत कक्षाला याबाबत माहिती दिली. घडामोडे स्वतः रुग्णालयात दाखल झाले. हा सगळा द्रविडी प्राणायाम केल्यानंतरच रुग्णालयाने संध्याकाळी सातच्या सुमारास रुग्णाला दाखल करून घेतले आणि उपचार सुरू केले. 

 वडिलांना अस्वस्थ वाटत असल्याने काल दुपारी एक वाजता आम्ही  एमजीएम रुग्णालयात गेलो. मात्र बेड नसल्याचे सांगत दाखल करून घेतले नाही. सहा तास आम्ही ताटकळत होतो. अखेर माजी महापौर बापू घडामोडे स्वतः आले त्यानंतरच संध्याकाळी सात वाजता आम्हाला दाखल करून घेण्यात आले व वडिलांवर उपचार सुरू करण्यात आले. आता वडिलांची तब्येत बरी आहे. असे सदर रुग्णाच्या मुलीने प्रतिनिधीला सांगितले.

हो, काल रुग्णाला दाखल करून घ्यावे यासाठी मी थेट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना फोन लावला. त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवली. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता मी रूग्णालयात गेल्यानंतर रुग्णाला दाखल करून घेण्यात आले. तब्बल पाच-सहा तास रूग्णाची अडवणूक झाली, असे प्रकार व्हायला नको.
- बापू घडामोडे, माजी महापौर

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker