मराठा आरक्षण : शिवबा संघटना रस्त्यावर

Foto
मराठा आरक्षणाबाबत अद्यापही कुठल्याही प्रकारची ठोस अशी भूमिका स्पष्ट झालेली नाही. आठ दिवसांत मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा. या मागणीसाठी आज सकाळी शिवबा युवा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन केले. 
शिवबा युवा सामाजिक विकास मंडळ संघटनेच्या वतीने आज सकाळी केंब्रिज चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी ’आम्हाला आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमचा हक्क आहे’ अशी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, मराठा आरक्षणाचा निर्णय होऊ पर्यत कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया राबवू नये. याशिवाय मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा अशा विविध मागण्या करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. दिव्या पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जर्‍हाड, प्रदेशाध्यक्ष गणेश शिंदे, ज्ञानेश्वर देवडे, देविदास पाठे, सतीश जगताप, प्रताप शिंदे, हरिभाऊ पाटील, रामा गोल्डे, ऋषी गोल्डे, संगीता जाधव, सुवर्णा तुपे, अर्चना नरवडे सह आदींनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker