मनपा प्रशासक पांडेय ऑन फिल्ड

Foto
चार दिवस क्‍वरंटाईन राहिल्यानंतर मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय पुन्हा कार्यरत झाले. शहरातील विविध क्वारंटाईन सेंटर भेट देऊन त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधला व परिस्थितीची पाहणी केली.  
प्रशासक पांडेय आज सकाळी 8 वाजताच ऑन फिल्ड होते. प्रथम त्यांनी किलेअर्क येथील कोविड सेंटरला व नंतर गारखेडा भागातील क्रीडा संकुलातील केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद सांधला. त्यांच्या जेवणाची तसेच अन्न सुविधांबाबत विचारपूस केली.  यावेळी त्यांनी मनपा कर्मचार्‍यांना सूचनाही दिल्या.  
यावेळी रुग्णांनी सर्व सुविधा मिळत आहेत , इथला स्टाफ सहकार्य करत आहे अशी प्रतिक्रिया दिली.तसेच याठिकाणी वातावरण सकारात्मक आणि आनंदमयी आहे, असेही ते म्हणाले. प्रत्येक मजल्यावर पाण्याचे जार पोहोचवा, जेवण वेळेवर द्या आदींबाबत पांडेय यांनी कर्मचार्‍यांना सूचना केल्या. त्यानंतर आयुक्तांनी गारखेडा येथील क्रीडा संकुलाची पाहणी केली. याठिकाणी त्यांनी क्वारन्टाईन असलेल्या नागरिकांशी संवाद साधत नाष्टा, जेवण इत्यादी सुविधांबाबत विचारणा केली.गेस्ट हाऊस इतर इमारतींची पाहणी केली आणि क्रीडा संकुलात कमीत कमी 1 हजार लोकांना एकाच वेळी  ठेवण्याची व्यवस्था त्वरीत करण्याचे आदेश दिले. या दिशेने साफ सफाई व इतर आवश्यक त्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी त्यांच्या बरोबर शहर अभियंता एस.डी. पानझडे, आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडाळकर, जनसंपर्क अधिकारी तोफीक अहंमद होते.
रुग्णांना दिला स्वत:चा संपर्क क्रमांक
किले अर्क कोविड केयर सेंटर याठिकाणी आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी नवीन आलेल्या रुग्णांना आपला मोबाईल क्रमांक देत काहीही अडचण आल्यास  किंवा सूचना असल्यास मॅसेज करण्यास सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker