महाविकास आघाडीचे तळ्यात मळ्यात राष्ट्रवादीचे मिशन -35

Foto
औरंगाबाद : येत्या एप्रिल  महिन्यात होणार्‍या औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी  कांग्रेस पक्षाच्या वतीने जय्यत तयारी सुरु केली आहे. कोरोना  व्हायरसच्या प्रादुर्भावाने राज्यात भीतीचे वातावरण आहे त्यातच  सत्ताधारी कांग्रेस, राष्ट्रवादी व सेना नेते  गुंतल्याने महाविकास आघाडीची बोलणी मागे पाडली आहे. आघाडी न झाल्यास  स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांनी  मिशन 35 लक्ष  समोर ठेवले आहे. या मिशनच्या दिशेने पक्षाने तयारी सुरु केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांच्या उपस्थित औरंगाबादेत पक्षाची नुकतीच  बैठक घेण्यात आली. बैठकीत नेत्यांनी  अक्षरश एक  दुसऱयांचे  कपडे  फाडत आपसातील वाद पक्षाध्यक्षा समोर आणले. पाटील यांनी नेत्यांना चांगलाच दम देत  पक्षात राहायचे असेल  तर  वाद  मिटविण्याची धमकी  दिली होती. जिल्हा शहर अध्यक्ष विजय साळवे यांच्याशी मतभेद  सध्यातरी  शमले आहे. दरम्यान  जिल्हाध्यक्ष  कैलास पाटील यांनी पालिका  निवडणुकीत  यश मिळवायचे असेल  तर  आपसातील हेवेदावे  बाजूला ठेवा असा सल्ला पक्षाच्या बैठकीत दिला. महाविकास  आघाडी होईल किंवा नाही या विषयी स्थानिक नेते शाश्वत नाही. त्यामुळे  स्वतःच्या बळावर निवडणूक लढण्यासाठी तयारी सुरु करण्यात आल्याची माहिती  राष्ट्रवादीच्या एका जबाबदार नेत्याने दिली. गेल्या पंधरा  दिवसात तिन्ही पक्षांच्या स्थानिक  नेत्यात  एकही बैठक झालेली नाही. सेनेच्या  नेत्यांना हक्काच्या अनेक  जागा सोडाव्या लागेल  अशी भीती आहे. असं झाल्यास पक्षात  बंडखोरी होईल त्याच  परीणाम थेट पक्षावर  होईल. काही  सेना नेत्यांनी निवडणुकी  नंतर आघाडीचा  प्रस्ताव  ठेवला आहे. दरम्यान  वरिष्ठ  पातळीवर  महाविकास आघाडी  व्हावी व  राज्याचा पॅटर्न  स्थानिक  निवडणुकात ही अमलात  यावा अशी भूमिका असल्याने तीनही पक्षाच्या नेत्यांनी  सावधगिरी बाळगली आहे. राष्ट्रवादीचे  2015 साली अकरा जागेवरून चार  जागाच जिंकता आल्या त्याही सर्व  महिला उमेदवार होत्या. शहरात  खंबीर  नेतृत्व  नसल्याने  तसेच  संघटनात्मक  दृष्टिकोनातून पक्ष  मजबूत नसल्याने  पक्ष  नेते आघाडी  झाली  तर  पक्ष  हिताचे  असेल असं त्यांना वाटत आहे. गेल्या पंचवीस  वर्षात सेनेने  शहराचा  विकास  केला  नाही, रस्ते, कचरा  पाणी तसेच  अनेक  मूलभूत  सुविधा  बद्दल  लोकांचा रोष आहेत. आघाडी न झाल्यास या मुद्द्यावर  निवडणूक लढता येईल अशी योजना नेत्यांची आहे. राज्यात सत्ता असल्याने  नेत्यांची भाषणं मतदारांना  आकर्षित करण्यासाठी पूरक  ठरेल, प्रमुख नेत्यांनी ठाण  मांडल्यास पस्तीस जागा  आरामात जिंकू असा विश्वास  ही नेत्यांनी  बोलवून  दाखवलं .            


महाविकास बाबत अजून  ठरलं नाही
महापालिका  निवडणुकीसाठी पक्षाने  इच्छूकांना अर्ज वाटप केले आहे. पंचाहत्तर वार्डा साठी  एकशे पंचाहत्तर  अर्ज  आलेले आहे. चाळीस  वॉर्डात  पक्षाला  उमेदवार नसलं तरी अनेक उमेदवारांनी पुरस्कृत उमेदवार करा अशी विनंती  केली आहे. आघाडी होईल किंवा नाही हे ठरलं नसलं तरी स्थानिक पातळीवर  आम्ही  पूर्ण  तयारी सुरु केली आहे. कमीत  कमी  ओएसटीस जागेवर  यश मिळेल अशी  अपेक्षा आहे. त्या दिशेने आम्ही तयार आहोत. या वेळी पालिका सत्तेत राष्ट्रवादीची महत्वाची भूमिका असेल.
-सलीम  शेख, सचिव  शहर जिल्हा राष्ट्रवादी  कांग्रेस