'तो'नराधम धमकी देऊन सोळा वर्षीय मुलीवर करीत होता अत्याचार

Foto
एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचे धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अनिस पठाण (वय २६, रा. नारेगाव) याला अटक केली. या आरोपीला कोर्टाने ३० जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश सुनावले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर २०१९पासून नारेगाव कचरापट्टीजवळ राहत असलेल्या एका १६ वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अनिस पठाण (वय २६, रा. नारेगाव) हा वेळोवेळी अत्याचार करत होता. या प्रकरणी मुलीने दिलेल्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अनिस पठाण या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला न्यायलयात हजर केल्यानंतर आरोपीची वैदयकीय तपासणी बाकी आहे. आरोपीने पीडितेचे फोटो काढले, असे पीडितेचे म्हणणे आहे. त्यानुसार आरोपीचा मोबाइल जप्त करायचा आहे. गुन्हा करण्यास आरोपीला कोणी मदत केली? याचा देखील तपास करणे बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब महेर यांनी न्यायलयाकडे केली. ही विनंती मान्य करून न्यायलयाने आरोपीला तीस जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker