जालना कंपनी अपघात मृतांचा आकडा सातवर

Foto
औरंगाबाद : जालना येथील अतिरिक्त औधोगिक वसाहती मध्ये झालेल्या भीषण अपघात चार जण मृत्युमुखी पडले होते .तर अनेक जण जखमी होते.यामधील औरंगाबादेत उपचार घेत असलेल्या अजून तीघांचा मृत्यू झाला.
राजाकुमार अशोककुमार सिंह, अंकुकुमार ललन ओझा (दोघेही रा. बिहार), राकेश पाल रामप्रताप पाल (रा. उत्तर प्रदेश) असे उपचार दरम्यान औरंगाबादेत मृत्यू पावलेल्या तिघांची नावे आहेत.

जालना येथील अतिरिक्त औधोगिक वसाहती मधील ओम साइराम स्टील अँड अलॉय कंपनी मध्ये गुरुवारी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक पणे  भीषण अपघात होऊन वितळलेल्या लोखंडचे तप्तरस वाहून नेणाऱ्या स्काय बकेट मधील तप्त रस  कंपनी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडल्याने चार जणांचा जागीच कोळसा झाला होता.तर 8 जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले होते.जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.त्यापैकी बीड बायपास परिसरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज  राजाकुमार अशोककुमार सिंह, अंकुकुमार ललन ओझा, राकेश पाल रामप्रताप पाल या तिघांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेमध्ये आता पर्यंत सात जणांचा जीव गेला आहे.या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker