वैजापूर पंचायत समितीसमोर आंदोलन
वैजापूर, (प्रतिनिधी) : अपंग अंगणवाडी सेविकेस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणातील आरोपी प्रवीण डोंगरे व ज्ञानेश्वर डोंगरे यांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी वैजापूर पंचायत समिती कार्यालयासमोर नुकतेच अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
या प्रकरणातील आरोपींवर कारवाई झाली नाही. यामुळे सर्व अंगणवाडी महिला सेविका आक्रमक झाल्या. चार तास चाललेल्या आंदोलनामध्ये अनेक सेविकांनी सहभाग नोंदवला.
जोपर्यंत आरोपीवर कारवाई करत नाही; तोपर्यंत अंदोलन थांबणार नाही, असा पवित्रा सेविकांनी घेतला.
कारवाई करून दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे राज्य सचिव कॉम्रेड शालिनी पगारे यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी यांनी निवेदन स्विकारल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. या वेळी झुंजार छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अरुण नवले, समाजसेवक अजय साळुंके यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.












