रियाला हायकोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर

Foto
ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मात्र यावेळी रियाला पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला असून पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईबाहेर प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. रियाची 1 लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियासोबत सुशांतचे कर्मचारी सॅम्यू्ल मिरांडा आणि दिपेश सावंत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सुशात सिंह प्रकरणी तपास यंत्रणाच्या रडारवर असणार्‍या रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. रियासोबत तिचा भाऊ शोविकलाही अटक झाली होती. कोर्टाने शोविकचा जामीन अर्ज फेटाळला आहे. शोविकसोबत अब्दुल बसितचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. रियाची 1 लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. रियाची सुटका करताना कोर्टाने सांगितले आहे की, रियाने सुटकेनंतर दर 10 दिवसांनी पोलीस स्थानकात हजेरी नोंदवावी. आपला पासपोर्ट जमा करावा तसेच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशात प्रवास करु नये. मुंबईबाहेर जायचे असल्यास तपास अधिकार्‍याला कळवावे. रियाचे वकील सतीश मानेशिदें यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले असून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, अखेर सत्याचा विजय झाला आहे. आम्ही सादर केलेले पुरावे न्यायालयाने मान्य केले आहेत. रियाची अटक आणि कोठडी ही असमर्थनीय आणि कायद्याच्या पलीकडे होती. सीबीआय, ईडी आणि एनसीबीने तिचा पाठलाग करणे आता थांबले पाहिजे. आम्ही सत्याशी बांधील आहोत. सत्यमेव जयते. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिला ड्रग्ज सेवनासह इतर आरोपांखाली 8 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker