विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक एकोप्याचा संदेश

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलचे पहल वार्षिक स्नेहसंमेलन उत्सहात पार पडले. शाळेच्या वतीने या वर्षी मनोरंजनात्मक कार्यक्रम न घेता सामाजिक भावना व विद्यार्थ्यांना आदर्श वाटेल असा कार्यक्रम या वर्षी साजरा केला. पहल म्हणजे काय एक नवीन सुरवात अशा बॅनरने पालकांचे लक्ष वेधले.

यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य, आई वडिलांचे प्रेम, शिक्षकांचा आदर, एकलव्यचे शौर्य, भारतीय सैनिकांची यशोगाथा, सावित्रीबाई फुले यांचे योगदान, संविधानाचे महत्व, शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये, सोशल मीडियाच्या वापराचे दुष्परिणाम, अन्नाचे महत्व, खेळातील आपले नैपून्य अशा विविध विषयांवर सादरीकरण करून उपस्थित पालकांचे मने जिंकली.

पालकांनी देखील मनोरंजनाचे गाणे सादर न करता अभिमान वाटेल अशा गाण्यावर सादरीकरण केल्याने समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वाल्मिक सिरसाठ, माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, भाऊसाहेब तुपे, वाल्मिक सुरासे, नवनिर्वाचित जिप सदस्य सविता संतोष जाधव, नगरसेविका पल्लवी सिरसाठ हे उपस्थित होते. 

या कार्यक्रमासाठी शाळेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब सिरसाट, सचिव प्रमोद महाजन, शिक्षिका भाग्यश्री नरोडे, वंदना चव्हाण, पूजा राजपूत, सुरेखा हिवाळे, शितल नरोडे, सोनाली लबडे, प्रियंका कळवणे, कांचन गायकवाड, वैष्णवी चव्हाण, श्वेता बत्तीसे, कोमल काकडे शिक्षक दत्तू कळवणे, रविराज थोरात, योगेश देवबोणे, शिवनाथ चव्हाण, गजानन राऊत आदींनी परिश्रम घेतले.