आरोग्य योजनेंतर्गत कोरोना रुग्णावर उपचार करणे परवडत नसल्याचा कांगावा

Foto
खाजगी रूग्णालयाच्या अजब अटी
 महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कोरोना रुग्णांवर उपचार करणे परवडत नसल्याचा कांगावा करीत खाजगी रुग्णालयाने प्रशासनाकडे उपचार साहित्याची मागणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. सरकारच्या आदेशाला ठेंगा दाखवणार्‍या या रुग्णालयांवर आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
कोरोना रुग्णांवर शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करावेत असे आदेश शासनाने दिले आहेत.  त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी खाजगी रुग्णालयांना पत्र देत कोरोना रूग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करावेत असे आदेश दिले. मात्र या आदेशाला खाजगी रुग्णालयांनी ठेंगा दाखवला आहे. सरकारने दिलेले 65 हजार रुपयांचे पॅकेज परवडत नसल्याची कांगावा रुग्णालये करीत आहेत. 
सर्वसामान्यांची परवड
 दरम्यान, शहरात संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दररोज दोनशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. सरकारी रुग्णालयात उपचार मोफत असले तरी खाजगी रुग्णालय मात्र भरमसाठ फी उकळत असल्याने सर्वसामान्यांची लूट होत आहे. शासनाच्या आदेशाला खाजगी रुग्णालय जुमानत नसल्याने सर्वसामान्य मात्र हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, महात्मा फुले योजनेअंतर्गत सरकारने दिलेले पॅकेज परवडणारे नाही. पीपीई किट, मास्क सॅनिटायझर यामुळे आधीच रुग्णालयाचा खर्च वाढला आहे. त्याच बरोबर रुग्ण संख्येवरही मर्यादा आल्या आहेत. सरकारच्या पॅकेजमध्ये उपचार परवडत नाहीत, अशी भूमिका खाजगी रुग्णालयांनी घेतली आहे. प्रशासनाने पीपीई किट सह उपचार साहित्याचा पुरवठा करावा, अशी मागणी खाजगी रुग्णालयांनी  केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker