पैठण बसस्थानकावर महिलांचे फोटो काढणाऱ्या गुंडाला दिले पोलिसांच्या ताब्यात

Foto
पैठण (प्रतिनिधी)  
पैठण बस स्थानकावर महिलांच्या शरीराचे मोबाईलमध्ये गुपचूप फोटो काढणाऱ्या गुंडाला महिलेने  पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. 

पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की रोहिणी दिनकर देवराई (वय ३६, रा. क्रांतीनगर मखमलाबाद नाका पंचवटी नाशिक जिल्हा नाशिक) त्या आयुर्वेदिक मेडिकल युनायटेड रेमेडीज चे प्रोडक्स विक्री करत आहेत त्या साठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते.त्या गुरुवारी १६ एप्रिल रोजी पैठण येथे गांगलवाडी येथील वंदना असुदे यांना मेडिसिन देण्यासाठी आल्या होत्या.मेडिसिन दिल्यानंतर त्या चार वाजेच्या दरम्यान पैठण बस स्थानक येथे नाशिकला जाण्यासाठी आल्या होत्या.

 त्या संभाजीनगर बसमध्ये जाऊन बसल्या असता बाहेरून एक इसम सदरील महिलेकडे बघून मोबाईल मध्ये फोटो काढत होता व विचित्र इशारे करीत होता व सदरील महिलेच्या शरीराकडे पाहून वाईट पाहून मोबाईल मध्ये फोटो काढत होता त्यामुळे सदरील महिलेच्या मनास लज्जा वाटली.सदर महिलेने खाली उतरून सदर व्यक्तीकडून  मोबाईल घेतला व चेक केला असता त्या मध्ये सदरील महिलेसह अनेक महिलांचे विविध भागाचे फोटो काढलेले आढळून आले. त्यामुळे सदरील महिलेने ११२ नंबर डायल करून पोलिसांना माहिती दिली. 

यावेळी बस स्थानक परिसरात असलेल्या कृष्णा रामनाथ लिंबोरे, योगेश सुनील चन्ने, शुभम गणेश तिवारी यांच्या मदतीने सदरील व्यक्तीला पकडून ठेवले.त्यांच्यासोबत पोलिस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केली. सदरील व्यक्तीने आपले नाव शब्बीर कादर शेख राहणार नांदर तालुका पैठण असल्याचे सांगितले.

सदरील महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शब्बीर कादर शेख राहणार नांदर तालुका पैठण याच्या विरुद्ध गुन्हा र.नं.१२३/२०२६ कलम ७९ भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यादव हे करीत आहे. 

दरम्यान पैठण बस स्थानकावर  हुल्लड बाजी करणारे टवाळखोरांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.विशेष म्हणजे शाळा सुटल्यानंतर हे टवाळखोर दुचाकी वाहनाद्वारे बस स्थानक परिसरात येऊन महिलांची, मुलींची छेडछाड करतात याकडे पोलिसांचे तसेच दामिनी पथकाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी केवळ एकच पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेला आहे तोही या ठिकाणी न थांबता इतरत्र भटकताना दिसत आहे.

बसताना कर मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना महिलांचे दागिने लांबवल्याच्या घटना घडल्या असून सदरील प्रकाराची पोलीस कुठलीही नोंद घेत नाहीत अशा अनेक तक्रारी आहेत.