जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने जीवनदान महाकुंभ २०२६
सिल्लोड, (प्रतिनिधी) : जगदुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने ४ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान ङ्गङ्घजीवनदान महाकुंभ २०२६ आयोजित करण्यात आला आहे. सिल्लोड तालुक्यात याच भरभरून प्रतिसाद मिळत असून, पालोद येथे शुक्रवार (दि.१६) रोजी झालेल्या रक्तदान कॅम्पमधे एकाच दिवसात तब्बल १०५१ रक्तकुपिका संकलीत करण्यात आल्या.
सलग दोन वर्षांपासून पालोद कॅम्पमधे विक्रमी रक्त कुपिका संकलीत झाल्याने या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने विविध उपक्रम राबिले जातात. ४ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान जीवनदान महाकुंभ २०२६ चे भव्यदिव्य आयोजन महाराष्ट्रासह इतर राज्यात राबविण्यात येत आहे. सिल्लोड तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पालोद येथे झालेल्या रक्तदान कॅम्प मधे एकाच दिवसात १०५१ एवढ्या रक्तदात्यांनी रक्तदान करुन विक्रमी नोंद केली आहे. सकाळी आठ वासता जगद्गुरु श्रींच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या तसेच पुजन सुरुवात झाली.
रक्तदान करण्यासाठी दात्यांनी गर्दी केली होती. यात युवती तसेच महिलांचाही प्रचंड प्रतिसाद पहावयास मिळाला. सायंकाळ पर्यंत रक्तदान सुरुच होते. तब्बल एकाच दिवसात १०५१ दात्यांनी विक्रमी रक्तदान करत पुन्हा विक्रम नोंदविला. विशेष म्हणजे पालोद येथील झालेल्या रक्तदान कॅम्प मधे सलग दोन वर्षांपासून विक्रमी रक्त संकलन होत असल्याने सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रक्तसंकलन आदर्श ब्लड बँकचे डॉक्टर तसेच सर्व टिम यांनी केले.
--- रक्तदान शिबीराला उत्साहात करुन दिव्यांग दात्यांचाही सहभाग ---
जगगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने प्रेरीत होऊन ङ्गङ्घ तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा या शिकवणी प्रमाणे स्वयंम पुर्तीने दिव्यांग बांधवांनी रक्तदान केले. यात देविदास गंगाराम म्हस्के (चिंचपुर) प्रकाश सुर्यभान सपकाळ (पालोदवाडी) यांनी सहभाग घेतला.
--- रक्तदान जनजागृती मोहीम ----
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने आयोजन जीवन महाकुंभ २०२६, तालुक्यात विविध ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती, तालुका सेवा समितीच्या वतीने पारदर्शक असे नियोजन करण्यात आले होते. गावो गावी शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. तसेच बैठकांचे आयोजन करण्यात आले. रामानंद संप्रदयाचे युवा युवती, महिला, पुरुष तालुका सेवा समितीचे आजी माजी पदाधिकारी, संतसंग कमिटी, भक्त, शिष्य व साधक यांनी परिश्रम घेतले.
--- पालोद कॅम्प विशेष नियोजन ---
एकाच दिवशी १०५१ दात्यांनी विक्रमी रक्तदान केली. पालोद येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात रक्तदान कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. भव्य मंडप, दात्यांची विशेष काळजी घेतली जात होती. चहा, बिस्किटे, केळी, फराळ तसेच महाप्रसादाचे आयोजन सेवा केंद्र पालोद वतीने करण्यात आले. यासाठी संग्राम सेनेच्या माध्यमातून पार्कीग, येणारे सर्व रक्तदाते सर्वांची विशेष काळजी घेतली जात होती.











