गंगापूर शहरासह तालुक्यात विधान परिषदेसाठी १०० टक्के मतदान

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : औरंगाबाद व जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान केंद्रांवर सायंकाळी ४ वाजेपर्यंत १००% टक्के मतदान नोंदविण्यात आले.
संभाजीनगर - जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर एकूण ३३ मतदार असून दीड वाजेपर्यंत ३३ मतदारांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. शेवटचा मतदान जिल्हा परिषद सदस्य कृष्णा पाटील डोणगावकर यांनी मतदान हक्क बजावला. 

मतपेट्या कडक बंदोबस्तात पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी पोलिस  गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज, उस्मानपुरा, मीनार येथे जमा करण्यात आल्या. महसूल विभागाच्या वाहनांद्वारे मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक करण्यात आली. गंगापूर नगर पालिकेच्या सभागृहात निवडणूक सहनिर्णय अधिकारी तथा प्रशिक्षण तहसीलदार सागर वाघमारे, नायब तहसीलदार सचिन वाघमारे, पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड, तलाठी गणेश लोणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.  दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी २२ जून रोजी होणार असून निकालाकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.