आरोग्य शिबिरात १०३ रुग्णांची तपासणी

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सव कालावधीमध्ये श्री गणेशा आरोग्य अभियान २०२६ अंतर्गत छत्रपती शिवाजी संघ, रंगरहट्टी पैठण या ठिकाणी नगर परिषद पैठण द्वारे मंगळवारी आरोग्य तपासणी शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.

 या प्रसंगी नगराध्यक्ष विद्या भूषण कावसनकर, उपाध्यक्ष तुषार पाटील मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, तसेच नगरसेवक, नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरामधे रोग निदान, औषधी वाटप, एचएलएल मार्फत रक्त तपासणी, महिला आरोग्य तपासणी, हाडे व सांधे तपासणी, डोळ्यांची तपासणी करण्यात आली. 

या प्रसंगी डॉ. रितेश माने, डॉ. अमोल मुळे, डॉ. शीतल घोडके डॉ. रेणुका अंभोरे, अमोल खामकर, ज्योती मुंडे, अर्चना कांबळे, प्रतीक सोलाट लॅब टेक्निशियन, नगर परिषद पैठण चे स्वच्छता निरिक्षक अश्विन गोजरे वनगर परिषद पैठण येथील कर्मचारी उपस्थित होते. सदरील शिबिरात एकूण १०३ महिला पुरुष यांची आरोग्य तपासणी करून योग्य उपचार घेतले.