छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): कर्करोगासारख्या गंभीर आजारावरील उच्च दर्जाच्या उपचारांसाठी आता मराठवाड्यातील रुग्णांना मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या महानगरांकडे धाव घेण्याची किंवा महागड्या खाजगी रुग्णालयांचा आर्थिक भुर्दंड सहन करण्याची गरज नाही. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. रुग्णालयात सुरू झालेल्या अत्याधुनिक रोबोटिक सर्जरी प्रणालीमुळे गेल्या वर्षभरात एकट्या स्त्री कर्करोग विभागाने तब्बल १०८ गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटच्या सहाय्याने यशस्वीपणे पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. शासकीय रुग्णालयातील ही कामगिरी मराठवाड्यातील सर्वसामान्य रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे.
राज्य योजनेअंतर्गत सुमारे ३२.५ कोटी रुपयांच्या निधीतून ही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण व
औषधी द्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे तत्कालीन आयुक्त राजीव निवतकर, डॉ. अनिल भंडारी, डॉ. पल्लवी सापळे, संचालक डॉ. अजय चंदनवाले, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास शर्मा, अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आणि स्त्री कर्करोग विभागप्रमुख डॉ. अर्चना राठोड यांच्या प्रयत्नातून ही सुविधा सुरू झाली.
रोबोटच्या हाताने कर्करोगावर उपचार
आशियातील पहिल्या रोबोटिक सर्जन पद्मश्री डॉ. मंजुळा अनागाणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अर्चना राठोड, डॉ. नरेंद्र पाटील आणि डॉ. कनीझ फातिमा यांनी पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी केली. भावेश अहिरे व कृष्णा गायकवाड यांनी सहाय्य केले. या प्रकल्पाला अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विशेष
वेदना कमी व रुग्ण लवकर घरी
रोबोटिक प्रणालीचे चार हात ३६० अंशांत फिरू शकतात. थ्रीडी व्हिज्युअलायझेशनमुळे डॉक्टरांना अधिक अचूकता मिळते. केवळ ५ ते ८ मिमीच्या छोट्या छिद्रातून शस्त्रक्रिया होत असल्याने रक्तस्त्राव, वेदना कमी होतात आणि रुग्ण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. खासगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया येथे अत्यल्प शुल्कात उपलब्ध होत आहेत.
अतिजोखमीच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया
स्त्री कर्करोग विभागात मे २०२५ पासून नियमित रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू झाल्या. यात गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, गर्भाशयाच्या गाठी, अंडाशयाचे आजार तसेच अतिजोखमीच्या रुग्णांवरील शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आतापर्यंत गर्भाशय कर्करोगाच्या ३६, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या २४, गर्भाशयाच्या गाठींच्या १२ आणि कर्करोगपूर्व स्थितीतील ३५ रुग्णांवर यशस्वी उपचार झाले. विशेष म्हणजे ८२ वर्षीय रुग्ण तसेच १०३ किलो वजनाच्या महिलेवरही यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया झाली.
कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड व वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व शस्त्रक्रियांत स्त्री कर्करोग विभागातील डॉ. अर्चना राठोड, डॉ. भक्ती कल्याणकर, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. श्रीकृष्ण चव्हाण, डॉ. कनीझ फातिमा, डॉ. ज्योती कोडीगिरे, डॉ. शगुफ्ता फातिमा,
डॉ. कविता कणसे, डॉ. श्रुती मिश्रा, डॉ. नंदिनी आणि डॉ. ओफायरा यांनी सहभाग घेतला. भूलशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीपक कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रश्मी बंगाली, डॉ. शीतल कोल्हे, डॉ. स्नेहल व डॉ. सायमा यांनी भूल व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions