मंजूर ११५ पदे, कार्यरत फक्त ५८ वैजापूर पोलिस स्थानकाचा डोलारा अर्ध्या मनुष्यबळावर

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) शहरासह परिसराची वाढती लोकसंख्या आणि वेगाने होणारे शहरीकरण लक्षात घेता, वैजापूर पोलिस स्थानकातील मनुष्यबळाची तीव्र टंचाई आता कायदा व सुव्यवस्थेसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. 

येथे विविध संवर्गातील ११५ पदे मंजूर असताना, प्रत्यक्षात केवळ ५८ कर्मचारी संपूर्ण कारभार पाहत -आहेत. तब्बल ५७ पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे.

ठाण्याच्या वैजापूर पोलिस कार्यक्षेत्रात वैजापूर शहरासह खंडाळा आणि लासूरगाव परिसरातील मोठ्या गावांचा समावेश होतो. एकट्या वैजापूर शहराची लोकसंख्या ५० हजारांहून अधिक आहे. असे असतानाही ठाण्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. मनुष्यबळाच्या या प्रचंड तुटवड्यामुळे गुन्हेगारी नियंत्रण मिळवणे अवघड आहे. 
-- आम्हाला अडचणीत आणू नका --
पोलिस स्थानकातील मनुष्यबळाच्या कमतरतेवर प्रतिक्रिया विचारली असता, वैजापूरचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले म्हणाले, की वेरूळ येथे नुकत्याच घडलेल्या प्रकारामुळे सध्या ग्रामीण पोलिसांवर जिल्हा पोलिस अधीक्षकांचे बारकाईने लक्ष आहे. 

त्यामुळे तुम्ही सध्या आमची प्रतिक्रिया वगैरे घेऊन आम्हाला अडचणीत आणू नका, नंतर पाहिजे तशी प्रतिक्रिया देऊ. व गस्त घालण्यात अडचणी येत आहेत. गृह विभागाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने पदभरती करावी, अशी मागणी होत आहे.