सिल्लोड, (प्रतिनिधी) : दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी नगरसेवक पदासाठी ११८ तर नगर अध्यक्ष पदासाठी १२ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत.
नगराध्यक्षपदासाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते यापैकी आज झालेल्या छाननी मध्ये ५ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले असून १२ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. तर नगरसेवक पदांच्या २८ जागांसाठी एकूण २२९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
यापैकी छाननी मध्ये १११ उमेदवारी अर्ज अपात्र ठरले असून ११८ उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत. सिल्लोड तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या नगरपरिषद निवडणूक कक्षात मंगळवारी उमेदवारी अर्ज यांची छाननी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश अपार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कारभारी दिवेकर, तहसीलदार संजय कुमार देवराये, जुबेर सिद्धीकी, देवेंद्र सूर्यवंशी व त्यांचे सहकारी कर्मचारी तसेच नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची यावेळी उपस्थिती होती.















