वाहतूक नियम तोडणाऱ्यांना 12 हजार 562 वाहनधारकांना दंड

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात तसेच जिल्ह्यात विविध भागात वाहतूक नियम मोडणाऱ्या विरोधात प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) गेल्या वर्षभरात 12 हजार 562 मेमो वाहनधारकांना बजाविण्यात आले. वर्षभरात 16 कोटी 64 लाख 27 हजार 966 रुपये दंड ठोठाविण्यात आला.
गेल्या काही वर्षांत वाहन अपघातांची संख्या वाढलेली आहे. याशिवाय वाहन अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या वाहनधारक पादचाऱ्यांची संख्याही वाढलेली आहे. याशिवाय वाहनांची संख्या वाढल्याने, रस्त्यावर वाहतूक नियमांचे पालन न करता, बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. दंड कमी असल्याने अनेक जण दंडाची पर्वा न करता, वाहने बेदरकारपणे चालवित असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. वाहनधारकांमध्ये वाहतूक नियम पालनाबाबत जागृती यावी. त्यांच्याकडून नियमांची पायमल्ली होता कामा नये. यासाठी गेल्या वर्षी आरटीओच्या दंडात्मक शुल्कात वाढ करण्यात आली आहे. पुर्वीच्या दंडापेक्षा दहा पट अधिक दंड भरावा लागत आहे.